खासदार राजन विचारे यांच्या इमारतीचा भाग कोसळल्यामुळं खळबळ

ठाण्याचे खासदार राजन विचारे हे राहत असलेल्या इमारतीचा काही भाग कोसळल्यामुळं आज खळबळ उडाली होती. संध्याकाळी ७च्या सुमारास हा प्रकार घडला. खासदार राजन विचारे चरईमध्ये राहतात. चरईमध्ये तळमजल्यावर विचारे राहतात. या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील काही भाग पडला. यामुळं खळबळ उडाली होती. हे वृत्त पसरताच महापालिकेच्या अधिका-यांनी त्वरीत धाव घेतली आणि परिस्थितीची पाहणी केली. ही इमारत साधारणत: सहा मजली असून पाचव्या मजल्यावरील काही भाग कोसळला होता.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading