ठाण्यात पुन्हा झाडाला गळफास लावून युवकाची आत्महत्या

ठाण्यात झाडाला गळफास लावुन आत्महत्या करण्याचे सत्र सुरूच असुन लॉकडाऊन काळात सलग तीन महिन्यात अशा प्रकारच्या तीन घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. घोडबंदर रोडवरील चितळसर-मानपाडा भागात तुषार गाईन या १८ वर्षाच्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही. टिकुजिनीवाडी परिसरात तुषार गाईन हा एकटाच राहतो. मच्छी विक्रेत्याकडे काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या तुषारने गुरूवारी सकाळी निर्जनस्थळी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकिय रुग्णालयात पाठवला. आत्महत्येपूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहीली नसल्याने त्याच्या आत्महत्येचे कारण कळु शकलेले नाही. 20 एप्रिल रोजी चितळसर पोलीस क्षेत्रातील मुल्ला बाग परिसरात आकाश जाधव या १८ वर्षाच्या युवकानेही झाडाला गळफास लावला होता. तर 15 मे रोजी कोरोना झाल्याच्या धास्तीने 60 वर्षीय दिलीप केळसकर यानी श्रीनगर परिसरातील जंगलात झाडाला गळफास लावुन आत्महत्या केली होती.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading