स्थानिक नगरसेवक, नागरिक यांच्याशी थेट संवाद साधत महापालिका आयुक्तांचा वागळे प्रभाग समितीचा दौरा

स्थानिक नगरसेवक, नागरिक यांच्याशी थेट संवाद साधत महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी आज वागळे प्रभाग समितीचा दौरा केला. आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर महापालिका आयुक्तांनी प्रत्यक्ष प्रभाग समिती स्तरावर भेटी देवून कामाचा आढावा घ्यायला सुरूवात केली आहे. डिसुझावाडी येथील सार्वजनिक शौचालयाची पाहणी करून शिवाजीनगर, साई मंदीर, हिरामोती भाजी मार्केट परिसराची पाहणी केली. त्यानंतर पडवळनगर येथील फिव्हर क्लिनिकला भेट देवून वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्याचबरोबर त्यांनी नगरसेवकांशीही संवाद साधून कोवीड 19 शी लढा देण्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्व करण्याची ग्वाही दिली. या दौऱ्याच्या माध्यमातून पालिका आयुक्तांचा नगरसेवक आणि नागरिक यांच्याशी थेट संवाद साधण्याबरोबरच तात्काळ निर्णयावर भर असल्याचं दिसून येतं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading