मुंब्रा येथे कोरोनामुळे तब्बल ४०० जणांचे मृत्यू तर ठाणे शहरात ८०० मृत्यू झाल्याचा किरिट सोमैय्यांचा आरोप

मुंब्रा येथे कोरोनामुळे तब्बल ४०० जणांचे मृत्यू तर ठाणे शहरात ८०० मृत्यू झाल्याचा आरोप किरिट सोमैय्या यांनी केला आहे.

मुंब्रा येथील एका दफनभूमीतच कोरोना आणि कोरोना संशयित १४२ नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद असल्याचं स्पष्ट झालं आहे. भारतीय जनता पक्षाच्या किरिट सोमय्या, निरंजन डावखरे यांनी मुंब्रा विभागाचा आज दौरा केला त्यावेळी ही बाब समोर आली आहे. मंगळवारी त्यांनी तत्कालीन महापालिका आयुक्तांची भेट घेतली होती. त्यावेळी ठाणे महापालिकेकडून मृतांची संख्या लपविली जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपाबाबत महापालिका प्रशासनाला खात्री देण्यासाठी आज मुंब्र्याचा दौरा करून तेथील चारही दफनभूमीतील नोंदीनुसार माहिती घेतली. त्यावेळी एम एम व्हॅलीनजीकच्या एका स्मशानभूमीत कोरोना आणि कोरोना संशयित म्हणून तब्बल १४२ नागरिकांचे दफनविधी झाले असल्याचे तेथील कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले. २२ मार्चपासून दररोज १४ ते १५ मृतदेह येत होते. त्यामुळे मुंब्रा-कौसा भागात कोरोनामुळे तब्बल ४०० जणांचे मृत्यू झाल्याचा संशय आहे. तर ठाणे शहरात ही संख्या ८०० पर्यंत आहे असा आरोप सोमय्या यांनी केला. मुंब्रा दफनभूमीत मार्चमध्ये ७४, एप्रिलमध्ये १६० आणि २३ जूनपर्यंत १७३ नागरिकांचे मृत्यू झाले. कौसा दफनभूमीत मार्चमध्ये ६३, एप्रिलमध्ये ८२, मे मध्ये २४० आणि २३ मेपर्यंत २०७ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत २७७ मृत्यू झाल्याचे राज्य सरकारने जाहीर केले. मात्र, मुंब्रा-कौसा भागातच १ एप्रिल ते २३ जूनपर्यंत ९५३ नागरिकांचे दफनविधी पार पडले आहेत. कोरोनामुळेच मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे याकडे महापालिका आयुक्तांचे लक्ष वेधले आहे. कोरोनाच्या संसर्गाने वाढत्या मृत्युमुळे मुंब्रा-कौसा येथील चार दफनभूमीपैंकी दोनची क्षमता संपली आहे. आणखी महिनाभरात दोन दफनभूमींमध्ये जागा राहणार नाही. त्यानंतर दफनविधी कुठे करायचे हा प्रश्न आहे. मात्र या विषयावर मुंब्रावासियांचे प्रतिनिधीत्व करणारे मंत्री गप्प का आहेत असा सवाल आमदार निरंजन डावखरे यांनी केला. मुंब्रावासियांसाठी तत्काळ दफनविधीसाठी मोठी जागा राज्य सरकारने द्यावी अशी मागणी डावखरे यांनी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading