ठाण्यात जेष्ठ नागरिक, अपंगासाठी कोविड मोबाईल लसीकरण सेंटर सुरु

ठाणे महापालिकेच्या वतीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचेननुसार शहरातील जेष्ठ नागरिक आणि 45 वर्षावरील अपंगासाठी मोबाईल लसीकरण सुविधेच्या माध्यमातून त्यांच्या घराजवळ लस देण्यात येणार असून महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते महापालिका भवन येथे या मोबाईल लसीकरण सेंटरचा शुभारंभ करण्यात आला. 60 वर्ष वयोगटातील जेष्ठ नागरिकांना तसेच 45 वर्षावरील अपंगत्व असणाऱ्या नागरिकांना लसीकरणासाठी केंद्रावर ये-जा करण्यासाठी त्रास होवू नये यासाठी त्यांना घराजवळच लस देण्याबाबत केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शन सुचेनेनुसार हे मोबाईल लसीकरण सेंटर सुरू करण्यात आले आहे. या कोविड-१९ मोबाईल लसीकरण सेंटरमध्ये १ वैद्यकीय अधिकारी, 1 व्हॅक्सिनेटर, 1 डेटा ऑपरेटर, आणि 1 निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील झोपडपट्टी परिसरासोबत इतर विविध ठिकाणी दररोज दुपारी 12 ते 4 या वेळेत 100 डोस देण्यात येणार असून एखाद्या नागरिकांकडे ओळखपत्र नसल्यास देखील लस देण्यात येणार आहे. यासाठी वेळापत्रक निश्चित करून त्यानुसार दररोज लस देण्यात येणार आहे. बसमध्ये बेडची व्यवस्था करण्यात आली असून जेष्ठ नागरिकांना बसमध्ये चढता येत नसल्यास खाली उतरून लस देण्यात येणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading