ऑनलाईन जिम्नॅस्टीक प्रिमियर लिग स्पर्धा संपन्न

ऑनलाईन जिम्नॅस्टीक प्रिमियर लिग स्पर्धा अलिकडेच संपन्न झाली. या स्पर्धेत चार संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत सरस्वती क्रीडा संकुलातील ३४ खेळाडू सहभागी झाले होते. सांघिक आणि वैयक्तीक प्रकारात ही स्पर्धा संपन्न झाली. टोकियो ऑलिम्पिक साठी जिम्नॅस्टीक विभागात निवड झालेल्या प्रणोती नायक हिने या स्पर्धेचं उद्घाटन आभासी पध्दतीनं केलं. कठीण परिस्थितीत जोमानं सराव करा असा संदेश तिने यावेळी दिला. यावेळी साहित्याविना वेगवेगळ्या प्रकारच्या जिम्नॅस्टीकच्या कसरती खेळाडूंनी यावेळी करून दाखवल्या. ८ वेगवेगळ्या गटातून एका खेळाडूला विजयी घोषित करण्यात आले. श्रेयस महाडीक, प्रिन्स जैन, समिरन जोशी, पृथ पत्रीकर, अनन्या शेट्टी, वरद राऊत, नचिकेत जोगळेकर आणि स्वरा शेट्ये हे खेळाडू या स्पर्धेत विजयी ठरले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading