ठाण्यात एका युवतीची आत्महत्या

ठाण्यातील टेकडी बंगला भागातील एका युवतीनं प्रेमसंबंधातून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोनिया राणे असं या युवतीचं नाव असून तिने गळफास लावून आत्महत्या केली. तिचे एका युवकाबरोबर प्रेमसंबंध होते. या युवकानं सोनियाला लग्नास नकार दिला होता. त्यामुळं तिने आत्महत्या केल्याचा दावा तिच्या कुटुंबियांनी केला आहे. सोनिया ही टेकडी बंगला इथे राहत होती. काल ती याच परिसरात राहणा-या आपल्या आत्याकडे गेली होती. त्यावेळी ती घरातील शयनगृहात गेली आणि तिने दरवाजा बंद केला आणि ओढणीच्या सहाय्यानं गळफास लावून आत्महत्या केली. बराच वेळ झाल्यावरही सोनिया बाहेर न आल्यानं तिच्या बहिणीनं वडीलांना बोलवून घेतलं. त्यानंतर घराचा दरवाजा उघडल्यावर हा प्रकार उघडकीस आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading