खंडणीसाठी बिल्डरला धमकावणा-या कथित पत्रकारासह दोघांविरोधात गुन्हा दाखल

खंडणीसाठी बिल्डरला धमकावणा-या कथित पत्रकारासह दोघांविरोधात मुंब्र्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंब्र्यात अनधिकृत बांधकामाविरोधात तक्रारी करून खंडणी उकळण्याचे प्रकार वाढले आहेत. अशाप्रकारे बांधकामाविरोधात तक्रारी न करण्याच्या नावाखाली मुंब्र्यातील बांधकाम व्यावसायिकाकडून ५० हजाराची खंडणी मागणा-या कथित पत्रकारासह जहांगिर अली आणि साबीर शहा अशा दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंब्र्यातील एका बांधकाम व्यावसायिकाचे शैलेशनगर आणि चांदनगर येथे बांधकाम सुरू आहे. यातील शैलेशनगरच्या साईटवर अली आणि शहा हे दोघेजण आले, त्यांनी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणच्या कामगाराला धमकावून बांधकाम व्यावसायिकास बोलवण्यास सांगितलं. त्यानुसार साईटवर आलेल्या बांधकाम व्यावसायिकाला या दोघांनी महापालिकेत तक्रार करून बांधकामावर कारवाई करण्यास लावू असं धमकावण्यास सुरूवात केली. अशी तक्रार न करण्यासाठी या दोघांनी ५० हजारांची मागणी केली. त्यावर या बांधकाम व्यावसायिकानं १५ हजार रूपये देऊन वेळ निभावून नेली. त्यानंतर पुन्हा अली आणि त्याचा साथीदार बांधकामाच्या ठिकाणी येऊन पैसे मागू लागल्यानं बांधकाम व्यावसायिकानं तक्रार करणार नाही अशा आशयाचं प्रतिज्ञापत्र या दोघांकडनं घेऊन दोन दिवसांनी पैसे देतो सांगून या दोघांविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलीसांनी या दोघांनाही ताब्यात घेतलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading