ठाण्यातील ३ तलावांच्या सुशोभिकरणासाठी ५ कोटींचा निधी

ठाण्यातील तलावांचं सुशोभिकरण केलं जाणार असून तीन तलावांमध्ये म्युझिकल फाऊंटन उभारलं जाणार आहे. ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील उपवन, कासारवडवली आणि मोघरपाडा येथे जुने तलाव असून तेथे परिसरातील नागरिक मॉर्निंग वॉकसाठी, फिरण्यासाठी, निवांत वेळ घालविण्यासाठी सकाळ-संध्याकाळी येत असतात. या तलावाचे जतन करण्याच्या दृष्टीने बनारस घाटाच्या धर्तीवर या तलावांवर घाटांचे बांधकाम करून त्या ठिकाणी म्युझिकल फाउंटन बसवून या तलावांचे सुशोभीकरण करण्यासाठी २५ कोटी निधी देण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्य सरकारकडे केली होती. कासारवडवली आणि मोघरपाडा ह्या दोन मोठ्या तलावांवर ’उपवन घाटाप्रमाणे बनारस घाटा“च्या धर्तीवर घाट बांधले जावे अशी संकल्पना असून जेणेकरून या घाटांचा उपयोग धार्मिक कार्यक्रमासाठी होईल. असे प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. कासारवडवली आणि मोघरपाडा येथील तलावांवर बनारस घाटाच्या धर्तीवर घाटांचे बांधकाम करण्यासाठी प्रत्येकी १० कोटी आणि उपवन, कासारवडवली तसंच मोघरपाडा या तीन तलावांमध्ये म्युझिकल फाउंटन बसविण्यासाठी ५ कोटी असे एकूण २५ कोटी राज्य सरकारकडून मंजूर करण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांना यश आले असून पहिल्या टप्यात राज्य सरकारने ५ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading