ठाण्यातील १२४ शाळांच्या इमारतींचं निर्जंतुकीकरण आणि पेस्ट कंट्रोल

ठाणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे सभापती योगेश जानकर यांच्या प्रयत्नानं ठाण्यातील १२४ शाळांच्या इमारतींचं निर्जंतुकीकरण आणि पेस्ट कंट्रोल विनामूल्य होणार आहे. ठाणे महापालिकेच्या १२४ शाळा असून ७८ इमारतींमध्ये त्या भरतात. मार्चमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे सर्व शाळा बंद करण्यात आल्या होत्या. गेल्या ७ महिन्यांपासून ऑनलाईन पध्दतीनं शिक्षण सुरू आहे. राज्यातील शाळा टप्प्याटप्प्यानं सुरू झाल्या असून कोरोना संक्रमण कमी होत असल्यानं इतर भागातील शाळाही लवकरच सुरू होतील अशी अपेक्षा आहे. शाळा सुरळीत सुरू होण्यापूर्वी शाळा सुरक्षित असल्याचा विश्वास पालकांमध्ये निर्माण करणं महत्वाचं आहे. ठाणे महापालिकेच्या सर्व शाळा निर्जंतुकीकरण करण्यासाठी १ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित होता. पण स्टार वन पेस्ट कंट्रोल सर्व्हीसेसनं या शाळांच्या निर्जंतुकीकरणाबरोबरच पेस्ट कंट्रोलही विनामूल्य करण्याची तयारी दर्शवली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading