ठाण्यातील सर्व कोरोना रूग्णांवर मोफत उपचार करण्याची ठाणे शहर काँग्रेसची मागणी

ठाण्यातील सर्व कोरोना रूग्णांवर मोफत उपचार करावेत अशी मागणी ठाणे शहर काँग्रेसनं केली आहे. सध्या ठाण्यात सुरू असलेल्या कोरोना रूग्णांच्या विषयावरून बोलावलेल्या एका पत्रकार परिषदेत शहर काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी ही मागणी केली. आंध्रप्रदेश सरकारनं जाहीर केल्याप्रमाणे ठाण्यातील सर्व विकासकामं बाजूला ठेवून कोरोना रूग्णांवर मोफत उपचार करावेत अशी मागणी करण्यात आली. कोरोना हा साथीचा रोग असताना आणि साथीच्या रोगावर कसे नियंत्रण मिळवावं, त्यासाठी काय उपाययोजना करावी, तसंच उच्च न्यायालयाचेही निकाल असताना ठाण्यातील अनधिकृत, निकष न पूर्ण करणा-या हॉस्पिटलवर कारवाई करण्यात आलेली नाही. यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विक्रांत चव्हाण यांनी केला. गेल्या वर्षापासून कोरोनाच्या नावावर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असून हॉस्पिटल उभारणी, औषध खरेदी, भोजन व्यवस्था अशा विविध गोष्टींमध्ये हा प्रकार सुरू आहे. यामध्ये महापालिका अधिकारी आणि सत्तारूढ पक्ष सहभागी असल्याचा आरोपही विक्रांत चव्हाण यांनी केला. या सर्व भ्रष्टाचाराची लाचलुचपत विभागामार्फत चौकशी करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही विक्रांत चव्हाण यांनी दिला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading