भिवंडीतील एका गोदामाला मोठी आग

भिवंडीतील एका गोदामाला मोठी आग लागली असून यामध्ये लाखो रूपयांचं नुकसान झाल्याचं सांगितलं जातं. भिवंडी-मानकोलीतील हरिहर कंपाऊंड येथे हे गोदाम आहे. या ठिकाणी हरिश बॅकेट या प्लास्टीक पेंट ब्रशच्या गोडावूनला दुपारच्या सुमारास भीषण आग लागली होती. सुदैवानं आत्तापर्यंत तरी यामध्ये काही जिवितहानी झाल्याचं वृत्त नाही मात्र या गोदामाला लागलेल्या आगीच्या ज्वाळा अगदी लांबूनही दिसत होत्या. या आगीचं वृत्त समजताच भिवंडी, कल्याण, ठाणे अग्निशमन दलाने त्वरीत धाव घेऊन ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading