ठाण्यातील मध्यवर्ती कारागृहात सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत ठाणे मुक्ती दिन उत्साहात साजरा

ठाण्यातील मध्यवर्ती कारागृहात सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत ठाणे मुक्ती दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत गेल्या आठ वर्षापासून ठाण्यात ठाणे मुक्ती दिन मोठ्या उत्साहत साजरा होत असतो.
27 मार्च 1737 साली चिमाजी अप्पा यांनी स्थानिकांच्या सहकार्याने किल्ल्यावर हल्ला चढविला आणी एका दिवसात पोर्तुगिजांच्या जोखडातून ठाणे किल्ला सोडविला. या झालेल्या लढाईत बलकावडे, ढमढरे अशा अनेक सरदारांनी शौर्य दाखवले. 27 मार्च 1737 रोजी ठाणे किल्ला पोरतुगिजांच्या जोखडीतून मुक्त केला यामुळेच या दिवसाचे महत्व ओळखून सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत जेष्ठ इतिहासकारांच्या आणि ठाणेकरांच्या उपस्थितीत ठाणे मुक्ती साजरा केला जातो असे ठाणे जिल्हा अध्यक्ष महेश विनेरकर यांनी बोलताना सांगितले. यावेळी आमदार संजय केळकर यांनी ठाणे मुक्ती दिनाच्या इतिहासाला उजाळा देऊन उपस्थितांसह योद्धांच्या प्रतिमेस आदरांजली वाहिली. ठाणे मुक्ती दिनाचे हे २८७ वे वर्ष असून सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे जिल्हा तर्फे गेल्या ८ वर्षांपासून ठाणे मुक्ती दिन साजरा केला जात आहे.
 
 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading