ठाण्यामध्ये झालेल्या एका अपघातात ड्रायव्हर आणि क्लिनर जखमी झाले. या अपघातामुळे घोडबंदर रस्त्यावर मोठी वाहतुक कोंडी झाली होती. मुंबईकडे येणारा हा अवजड कंटेनर काजुपाडा येथे उलटा झाला. या मध्ये या कंटेनरचे ड्रायव्हर आणि क्लिनर गंभीर जखमी झाले. कंटेनर पलटी झाल्यामुळे घोडबंदर रस्त्यावर वाहतुक कोंडी झाली होती. पोलिसांनी त्वरीत धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.