ठाण्यातील खाजगी आस्थापना तीन दिवस बंद ठेवण्याचे नवनियुक्त महापालिका आयुक्तांचे आदेश

ठाण्यातील खाजगी आस्थापना तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेश नवनियुक्त महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत. विजय सिंघल यांनी महापालिका आयुक्त पदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर अधिका-यांच्या एका बैठकीत त्यांनी हे आदेश दिले. कोरोना विषाणू संदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत त्यांनी आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणा-या आस्थापना वगळून इतर सर्व खाजगी आस्थापना तीन दिवस बंद ठेवावेत आणि महापालिकेतील उपस्थितीही ५० टक्क्यापर्यंत शिथील करावी असे आदेश त्यांनी दिले. महापालिकेत बाहेरून ट्रेनने, बसने येणा-या कर्मचा-यांनी कार्यालयात उपस्थित न राहता आवश्यकतेनुसार घरातूनच काम करावं अशी सूचना त्यांनी केली. परिवहन सेवेच्या बसमधून उभे राहून प्रवासी प्रवास करणार नाहीत याची दक्षता घ्यावी त्याचप्रमाणे बसमध्ये एका सीटवर एकच प्रवासी बसेल हे पहावे अशा सूचनाही महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading