ठाण्याचे माजी महापौर नरेश मस्के शिवसेनेच्या प्रवक्ते पदी

ठाण्याचे माजी महापौर नरेश मस्के यांची शिवसेनेच्या प्रवक्ते पदी निवड झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही नियुक्ती केली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून जावेळी सुरतेची वाट धरली होती. त्यावेळी ठाण्यातून पहिला पाठिंबा नरेश मस्के यांनी जाहीर केला होता. म्हस्के यांनी नंतर त्यांच्या समर्थनार्थ जाहीर सभा ही घेतली होती. त्यांच्या या सभेमुळे त्यांना जिल्हाप्रमुख पदावरून हटवण्यात आलं होतं. मात्र एकनाथ शिंदे यांनी पुन्हा त्यांची शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती केली होती. आता त्यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे दीपक केसरकर हे मुख्य प्रवक्ते आहेत त्यांच्याशिवाय किरण पावस्कर, शीतल म्हात्रे यांचीही प्रवक्तेपदी नियुक्ती झाली आहे. आता त्यात नरेश मस्के यांचीही भर पडली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading