ठाणे शहराची वाटचाल नवनिर्मितीच्या दिशेने

महापालिका कार्यक्षेत्रातील सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी गेले दोन महिने महापालिका आयुक्तांनी प्रभागसमितीनिहाय दौरे केले होते. या दौऱ्यादरम्यान तातडीने कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी पूर्ण केल्याने नागरिकांना ठाणे शहराचे रुप अनुभवयास मिळत असून अनेक सेवासुविधा या माध्यमातून उपलब्ध झालेल्या आहेत. शहरातील विविध ठिकाणी सौंदर्यीकरण करणे, रंगरंगोटी, नालेसफाई, रस्ते दुरूस्तीची बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. शहरातील सर्व नाल्यांची साफसफाई ही समाधानकारकरित्या करण्यात आली आहे, नाल्यामध्ये तरंगणारा कचऱ्याची नियमित साफसफाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले असून पावसाळा संपेपर्यत नालेसफाईची संपूर्ण जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असणार आहे. महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेली कामे जवळजवळ पूर्णत्वास येत आहेत. यामध्ये शहरातील विविध ठिकाणचे चौक, भिंती या विविध प्रबोधनात्मक थीमच्या माध्यमातून रंगरंगोटी करुन सुशोभिकरण करण्यात आले आहे. तसेच शहरातील विविध ठिकाणी रस्त्यांच्या सिमेंट कॉक्रिटीकरण रस्ते, दुभाजक, डांबरीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत. ठाणे शहरातील तलावांचे सुशोभिकरण, सौंदर्यीकरण, स्वच्छता, दुरूस्ती, रंगरंगोटी, कारंजे, तलावांच्या संरक्षक भिंतीवर थीमनुसार रंगरंगोटी करण्यात आली आहे, तलावांचे बदललेले रुप पाहण्यासाठी ठाणेकर मोठ्या संख्येने विरंगुळयासाठी जमत आहेत. तसेच शहरातील प्रमुख मुख्य रस्त्यावरील रस्ता दुभाजक सुशोभिकरण, रंगरंगोटी करणे आदी कामे करण्यात आली आहे. शहरातील स्म्शानभूमी हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. ठाण्यातील मुख्य समजली जाणारी जवाहरबाग स्मशानभूमींमध्ये महानगर गॅस पाईप शवदाहिनचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. माजिवडा मानपाडा, लोकमान्यनगर, वागळे इस्टेट, उपवन येथील रामबाग स्मशानभूमी, कळवा, मुंब्रा या ठिकाणच्या सर्वच स्मशानभूमीमध्ये चुल्हयांची संख्या वाढविणे, शवदाहिनी बसविणे, आवश्यक त्या ठिकाणी रंगरंगोटी, छत दुरूस्ती, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृहाची डागडुजींची कामे पूर्ण करण्यात येत आहेत. ठाण्यातील तलावांचे सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे, यामध्ये हरियाली, खारीगांव, कौसा, दातिवली, मासुंदा, रायलादेवी आदी तलावांचा समावेश असून काही कामे पूर्ण झाली आहेत तर काही तलावांची कामे प्रगतीपथावर आहेत. कचराळी तलाव येथील जलशुध्दिकरण प्रकल्प पुनश्च कार्यान्वित करण्यात आला आहे. उपवन आणि तीन हात नाका येथील रस्त्याचे सरफेसींग, ग्रील बसविणे, फूटपाथ दुरूस्‌ती करुन हॅप्पी स्ट्रीटची निर्मिती करण्यात आली आहे. खारटन रोड येथील परिसरात सुशोभिकरण करुन संपूर्ण परिसराचा कायापालट करण्यात आल्यामुळे येथील नागरिकांनी प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहे.
ठाणे महापालिकेच्या सर्व शाळांची पाहणी महापालिका आयुक्‌तांनी केली असून शाळा सूरु होण्यापूर्वी अत्यावश्यक सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत. यामध्ये वर्गखोल्यांची डागडुजी, पिण्याची पाणी, थीमनुसार रंगरंगोटी, मैदाने, विद्युत व्यवस्था आदी कामे पूर्ण करण्यात येत आहेत. विविध ठिकाणच्या नाल्याच्या ठिकाणी संरक्षक भिंती बांधणे, विद्युतवाहिन्या स्थलांतरीत करण्यासोबतच मॉडेला मिल, जॉर्ज ऑटोमोबाईल येथील नाल्यांच्या पुर्नबांधणीचे काम सुरु असून रस्त्याच्या लगत असलेल्या नाल्यांचे काम पूर्णत्वास येत आहे. डोंगर उतारावरुन वाहुन येणारे पाणी तसेच सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी मराठा हॉटेल रोड नं. 33, एमआयडीसी विभागात ठाणे शहरातील सर्वात मो्ठया कलव्हर्टचे काम पूर्ण झाले आहे, याच धर्तीवर जॉर्ज ऑटोमोबाईल, राजीव गांधीनगर येथे 12×5 मीटर लांबीच्या कलव्हर्टचे काम पुर्ण झाले आहे. वागळे इस्टेट येथील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम करण्यात आले असून मॉडेला मिल येथे ट्रक टर्मिनलच्या माध्यमातून पार्किंगचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. सद्यस्थितीत रोड क्र. 33 च्या रस्तारुंदीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. श्रीनगर येथे पावसाचे पाणी नागरी वसाहतीमध्ये जात असल्याने सदर पाण्याचा निचरा होण्यासाठी रस्त्यावर लोखंडी जाळी बसविण्याचे काम पुर्ण झाले आहे. शहरातील सर्व कलव्हर्टची साफसफाई पूर्ण झाली आहे. शहरातील वर्दळीच्या, सार्वजनिक ठिकाणच्या विद्युत ओव्हरहेड वायर भूमीगत करणेबाबत देखील आदेश देण्यात आले होते, या कामाची सुरूवात झाली असून रोड नं. 16 येथील काम पूर्ण करण्यात आले आहे. शहरातील नागरिकांना विना अडथळा मॉर्निंग वॉक करता यावे यासाठी शहरातील उपवन परिसर, एलबीएस रोड आदी ठिकाणी हॅप्पी स्ट्रीट ही संकल्पना राबविली असून यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सुरेंद्र इंडस्ट्रीजच्या रस्त्यावर सायकलप्रेमींसाठी सायकल ट्रॅक निर्माण करण्यात आले आहे. शहरातील लहान मो्ठया सर्व उद्यानाची आवश्यक ती डागडुजी, रंगरंगोटी, लहान मुलांचे खेळाचे साहित्य, ओपनजीम, वृक्षारोपण आदी कामे पूर्ण होत आहेत. तसेच पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक तसेच आवश्यकतेनुसार फांद्याची छाटणी करण्यात आली आहे. तसेच शहरातील सर्व रस्ते दुभाजकांमध्ये विविध आकर्षक सुशोभिकरणाची झाडे लावण्यात आली आहे. कळवा विभागामध्ये नव्याने दोन पाण्याच्या टाक्या कार्यान्वित करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले असून या ठिकाणचे आरोग्यकेंद्र सुरूकरण्यात आले आहेत तर नजीकच्या काळात प्रसुतीकेंद्राच्या बांधकामास सुरूवात करण्यात येणार आहे. कळवा हॉस्प‍िटल येथील नॉन क्लिनिकल विभाग माजिवडा येथील पोस्ट कोविड सेंटर येथे स्थलांतरीत करण्यात आल्यामुळे कळवा रुग्णालयाला दैनंदिन वैद्यकीय सेवा देणे सोईचे होत आहे. खारीगांव येथील आरओबीच्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी उदवाहन बसविण्याचे आदेश महापालिका आयुक्‌तांनी दिले आहेत तर जुन्या मुंबई पुणे रस्त्यावर रंगरंगोटी करणे, रस्ता दुभाजकाचे काम करणे, फ्लॅवरबेड तयार करणे आदी कामे सुरू करण्यात आले आहे. दिवा येथील आरओबीचे काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी योजना आखली असून यामध्ये बाधित झालेल्या 364 नागरिकांचे पुनर्वसन पूर्ण झाले आहे, तर बाधित इमारती निष्कसित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. दिवा विभागात आरोग्य केंद्र सुरू करण्यासाठी भाडेतत्वावर जागा घेतली असून या ठिकाणी लवकरात लवकर आरोग्य केंद्र सुरू करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहे. मौजे कोपरी येथील वनविभागाचा भूखंड ताब्यात घेवून या ठिकाणी रोझ उद्यान उभारणेबाबत महापालिकेतर्फे कारवाई सुरू करण्यात आली आहे. शहरामध्ये संक्रमण शिबिर उभारावे याबाबत शहरविकास विभागाच्या माध्यमातून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तसेच शहरातील विसर्जन घाटांची पाहणी देखील करण्यात आली असून बहुतांश विसर्जनघाटांचे काम पुर्ण झाले आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील विविध विकासकामे जलदगतीने पूर्ण व्हावीत यासाठी एमएमआरडीएच्या पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे सहकार्याने मोठया प्रमाणात निधी उपलब्ध झाला असून, यामध्ये महापालिकेनेही 15 कोटी निधी दिला आहे. शहरसौंदर्यीकरणासाठी 130 कोटी, रस्ते बांधकाम, दुरूस्तीसाठी 214 कोटी आणि एमएमआरडीए अंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांसाठी 65 कोटी रुपये निधी मिळाला त्याबद्दल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे महापालिका आयुक्तांनी आभार व्यक्त केले आहेत.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading