कल्याण डोंबिवली क्षेत्रातील पत्रकार आणि पोलीस यांची कोरोना चाचणी

कल्याण डोंबिवली क्षेत्रातील पत्रकार आणि पोलीस यांची कोरोना चाचणी खासदार श्रीकांत शिंदे आणि शिवसेना वैद्यकीय मदत यांच्या वतीने करण्यात आली. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांची संख्या १४३ वर पोहचली आहे. यामध्ये आत्तापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला असून ४५ जण बरे होऊन घरी गेले आहेत. टाळेबंदी असून देखील पत्रकार आपली जबाबदारी ओळखून बातम्या लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम करतात. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या मार्फत काल कल्याण डोंबिवलीतील ६० पत्रकार आणि पोलीसांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading