ठाणे रेल्वे स्थानक परिसरात राबवलेल्या विशेष मोहिमेत स्वच्छतेचा जागर

शहरात ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या अभियानातंर्गत सौंदर्यीकरण, सुशोभिकरण, स्वच्छता, शौचालयांची स्वच्छता महापालिका कार्यक्षेत्रात दैनंदिन सुरू असून हा बदलही नागरिकांना दिसू लागला आहे. तसेच ठाणे स्टेशन आवारातील 150 मीटर परिसरातील फेरीवाले हटविल्यामुळे पदपथ मोकळे झाले आहे. दैनंदिन स्वच्छतेबरोबर ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात पूर्व आणि पश्चिम बाजूस ठाणे महापालिका आणि विविध संस्थांच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियानातंर्गत्‍ ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023 विशेष स्वच्छता अभियान’ राबविण्यात आले. या मोहिमेतंर्गत परिसर अस्वच्छ करणाऱ्या, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या आणि प्लॅस्टिचा पिशव्यांचा साठा करणाऱ्या दुकानदारांविरोधात कारवाई करुन एकूण 22 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महानगरपालिका आणि विविध अशासकीय संस्थांच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत विशेष स्वच्छता मोहिम स्टेशन परिसरातील सॅटिस पूल, ठाणे पूर्व आणि पश्चिम परिसरात राबविण्यात आली. यात ठाणे महापालिकेतील घनकचरा विभाग, रोटरी क्लबच्या विविध शाखा, सेंट्रल रेल्वे, अशासकीय संस्था, महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी सहभागी झाल्या होत्या. या मोहिमेत सॅटिस पुल, दादा पाटीलवाडी, कोपरी पूर्व स्टेशन परिसरातील भिंतीवर चिटकविण्यात आलेली जाहिरांतीची भित्तीपत्रके काढण्यात आली. ज्या ज्या ठिकाणी भित्तिपत्रकांमुळे विद्रुपीकरण झाले होते, असा परिसर पाण्याच्या सहाय्याने स्वच्छ करण्यात आला. तसेच ज्या दुकांनासमोर अस्वच्छता आढळून आली असे दुकानदार आणि पानटपरीधारक तसेच प्लॅस्टिकचा साठा करणारे दुकानदार अशा एकूण 160 दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करुन एकूण 22,700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यावेळी संपूर्ण परिसर स्वच्छ करुन करण्यात तसेच यावेळी स्वच्छतेची शपथ नागरिकांना देण्यात आली. या विशेष मोहिमेत ठाणे महापालिकेचे सर्व स्वच्छता निरीक्षक, उपमुख्यस्वच्छता निरीक्षक, तसेच 300 हून अधिक सफाई कर्मचारी सहभागी झाले होते. स्वच्छता ही जरी महापालिकेची जबाबदारी असली तरी प्रत्येक नागरिकांनी याचे पालन केल्यास परिसर स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे यासाठी नागरिकांनी देखील महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading