ठाण्यामध्ये अपेक्षेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

ठाण्यामध्ये अपेक्षेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नगरसेवकांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे यांच्यासह 3 नगरसेवकांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. महापालिकेमध्ये कोणत्याही परिस्थितीत प्रभुत्व मिळवायचं यासाठी प्रयत्न सुरू असून त्याच दृष्टीने ही चढाओढ  सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलताना येतो झाकी है अगला स्टेशन बाकी है अशी घोषणा करून या मागची उत्सुकता वाढवली आहे. नजीकच्या काळात कोणत्या पक्षातून किती नगरसेवक फुटणार याची चर्चा सध्या सुरू आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading