ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरूष गटात एअर इंडिया तर महिला गटात डब्ल्यू टी इन्फ्रा संघाला विजेतेपद

ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरूष गटात एअर इंडिया तर महिला गटात डब्ल्यू टी इन्फ्रा या संघांनी विजेतेपद पटकावलं. विजेत्या संघांना १ लाख रूपये रोख आणि स्मृतीचिन्ह देऊन महापौरांच्या हस्ते गौरवण्यात आलं. ठाणे महापालिकेच्या महिला संघाला या स्पर्धेत उपविजेतेपद मिळालं. तर पुरूष गटात सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा संघ उपविजेता ठरला. उपविजेत्यांना ७५ हजार रूपये रोख आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. या स्पर्धेत पुरूष गटात १८ तर महिला गटात १५ संघ सहभागी झाले होते. पुरूष गटात उत्कृष्ट चढाई पटू म्हणून सुशांत साहिल, उत्कृष्ट पकड काळीराम म्हात्रे, उदयोन्मुख खेळाडू अक्षय मखवाणा तर उत्कृष्ट खेळाडू म्हणून पंकज मोहितेला गौरवण्यात आलं. महिला गटामध्ये उत्कृष्ट चढाई पटू म्हणून सायली केरीपले, उत्कृष्ट पकड पौर्णिमा जेधे, उदयोन्मुख खेळाडू अदिती जाधव तर उत्कृष्ट खेळाडू म्हणून कोमल देवकर यांना गौरवण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading