ठाणे महापालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून ६ दशलक्ष लिटरचा अतिरिक्त पाणी पुरवठा

ठाणे महापालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून ६ दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी पुरवठा होत आहे. ठाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन ठाणे महापालिकेनं स्टेम प्राधिकरणाकडून १० दशलक्ष लिटर पाण्याची मागणी केली होती. पण सध्या ६ दशलक्ष लिटर पाणी पुरवठा वाढवण्यात आला आहे. शहरामध्ये पाण्याचं वितरण योग्यत-हेनं होत नसल्यानं काही भागात अधिक तर काही भागात कमी पाणी पुरवठा होतो. त्याचप्रमाणे पाण्याचा दाबही योग्य नसतो. काही ठिकाणी जलवाहिन्या या जुन्या झाल्या असल्यामुळे त्याचाही परिणाम होतो. यासाठी ठाणे महापालिकेनं १० दशलक्ष लिटर वाढीव पाण्याची मागणी केली होती. त्यापैकी ६ दशलक्ष लिटर वाढीव पाणी पुरवठा स्टेम प्राधिकरणानं सुरू केला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading