ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी राम रेपाळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. स्थायी समितीच्या काल झालेल्या बैठकीत राम रेपाळे यांची ही बिनविरोध निवड झाली आहे. त्याचप्रमाणे ५ विशेष समित्यांच्या सभापतींचीही बिनविरोध निवड झाली. शिक्षण समिती सभापती पदी विकास रेपाळे, महिला आणि बालकल्याण समिती सभापती जयश्री डेव्हीड, क्रीडा आणि समाजकल्याण तसंच सांस्कृतिक कार्यक्रम सभापती पदी अमर पाटील, गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती सभापती पदी मंगल कळंबे, आरोग्य समिती सभापती पदी केवलादेवी यादव या बिनविरोध निवडून आल्या.