आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अनोख्या पध्दतीनं अभिवादन

धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठानच्या वतीनं येत्या २६ ऑगस्टला शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अनोख्या पध्दतीनं अभिवादन केलं जाणार आहे. २६ ऑगस्टला आनंद दिघे यांच्या कामाचा लेखाजोखा मांडणा-या संकेतस्थळाचं उद्घाटन केलं जाणार आहे. तसंच आनंद दिघे यांचं ठाण्यात भव्य स्मारक उभारण्यासाठी राज्य आणि महापालिका स्तरावर पाठपुरावा करणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष केदार दिघे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. दिघे यांच्या आठवणींना उजाळा मिळावा म्हणून त्यांच्यासोबत राहिलेल्या जुन्या जाणत्या लोकांना आपलं मन मोकळं करात यावं आणि त्या काळातील अनुभव नव्या पिढीला समजावेत यासाठी गडकरी रंगायतन येथे आनंद संवाद या विशेष चर्चात्मक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आनंद दिघे यांच्या स्मारकासंदर्भात नागरिकांची मतं आणि संकल्पनाही जाणून घेतल्या जाणार आहेत. जे ठाणेकर लोकहिताचा आणि समाजोपयोगी स्मारकाचा आराखडा देऊ इच्छीत असतील त्यांनी धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठानाशी संपर्क साधावा असं आवाहन केदार दिघे यांनी केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading