संस्कारभारतीतर्फे कासारवडवली येथे भव्य रांगोळी

संस्कार भारती कोकण प्रांत ठाणे समितीतर्फे हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी कासारवडवली भव्य रांगोळी साकारण्यात येणार आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी कासारवडवली येथील महापालिकेच्या मैदानावर ७ हजार चौरस फूट आकाराची भव्य रांगोळी साकारण्यात येणार आहे. गेले दोन वर्ष कोरोनामुळे आयोजन करण्यात आलं नव्हतं. परंतु पुन्हा यावर्षी संस्कार भारतीतर्फे रांगोळी काढण्यात येणार आहे. यावेळी नि:शुल्क कार्यशाळेचं आयोजनही करण्यात येणार आहे. तसंच शोभायात्रेदरम्यान स्पॉट रांगोळ्या काढण्यात येणार आहेत. हे रांगोळी प्रदर्शन शुक्रवारी १ एप्रिल पासून रविवार ३ एप्रिलपर्यंत सर्वांसाठी खुले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading