ठाणे महापालिकेच्या वतीने जागतिक हिवताप निर्मूलन दिन साजरा

ठाणे महापालिकेच्या वतीने नुकताच जागतिक हिवताप निर्मूलन दिन साजरा करण्यात आला. मलेरियाचे उच्चाटन करण्यासाठी यंदा जागतिक आरोग्यसंघटनेमार्फत गुंतवणूक, नाविन्य आणि अंमलबजावणी हे धोरण जाहीर करण्यात आले आहे. शून्य हिवताप रुग्ण या मोहिमेसाठी हिवतापावरील उपचार आणि प्रतिबंध याबद्दल समाजात जनजागृती करणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे, यासाठी ठाणे महापालिकेच्या विविध आरोग्य केंद्रात हिवताप दिनाचे औचित्य साधून रॅली तसेच व्याख्यानाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. जागतिक हिवताप दिनानिमित महापालिकेच्या आरोग्य केंद्रातील परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी यांच्यासाठी मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात उपस्थित परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना हिवतापाबाबत घ्यावयाचे उपचार यांची माहिती देण्यात आली. गर्दीच्या ठिकाणी हिवतापाची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागृती करावी. प्रत्येक आरोग्य कर्मचा-यांनी 100 घरांचे सर्वेक्षण करावे, डासांची उत्पत्ती होत असलेल्या ठिकाणची माहिती घेवून त्यावर उपाययोजना म्हणून डासोत्पत्ती स्थानांमध्ये गप्पी मासे सोडणे, वैद्यकीय अधिकारी यांनी प्राथामिक आरोग्यकेंद्रात घेतल्या जाणाऱ्या मासिक सभेमध्ये आशांना आणि आरोग्य कर्मचा-यांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती द्यावी आणि हिवतापाबाबत जनजागृती करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या. जागतिक हिवताप दिनाचे औचित्य साधून ठाणे महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्र वाडिया येथे आशावर्कर, ए.एन.एम यांच्यामार्फत मलेरिया रुग्णास भेटी देवून त्यांची तपासणी करण्यात आली. तसेच नौपाडा येथील आरोग्य केंद्रामध्ये हिवतापाबाबत जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading