गुरुद्वारातून प्रसाद आणण्याच्या बहाण्याने १६  वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

गुरुद्वारातून प्रसाद आणण्याच्या बहाण्याने १६  वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना उल्हासनगर शहरातील मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गुरुद्वाराच्या पाठीमागे असलेल्या इमारतीच्या जिन्यात घडली आहे. याप्रकरणी  मध्यवर्ती पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे. आवतार अंकल असे  आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलगी कुटूंबासह उल्हासनगर शहरात राहत असून ती नित्यनेमाने घरानजीक असलेल्या गुरुव्दारात पहाटे साडेचार ते सकाळी सहा वाजेपर्यत प्रार्थना करण्यासाठी जात असे, तर आरोपी हा त्याच परिसरात असलेल्या एका गुरुद्वारात ग्रथंपठणचे काम करत असल्याने दोघांची ओळख होती. त्यातच आरोपीची या मुलीवर बऱ्याच दिवसापासून वाईट नजर असल्याने तो तिला एकटीला  गाठून  तिच्यावर अत्याचार करण्याच्या प्रयत्नात होता. विशेष म्हणजे आरोपी गुरुद्वाराच्या पाठीमागे असलेल्या इमारतीत राहत असल्याने या मुलीला अवतारने गुरुद्वारातुन कढी चावल चा प्रसाद आणण्यास सांगितले. तो इमारतीच्या खालीच उभा असताना  प्रसाद घेऊन ती त्याच्याजवळ येताच  इमारतीच्या जिन्यामध्येच तिच्याशी अश्लील चाळे करत तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. या घटनेमुळे भयभीत झालेल्या या मुलीने त्याच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घर गाठले. घरी येताच तिच्यावर घडलेला प्रसंग आई आणि मोठ्या बहिणीला सांगताच संपूर्ण कुटूंब भयभीत झाले होते. दुसऱ्या दिवशी धाडस करून पीडित मुलीने आई आणि बहिणीसह मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठून तिच्यावर घडलेला प्रसंग सांगताच पोलिसांनी आवतार अंकल विरोधातगुन्हा दाखल केला. मात्र गुन्हा दाखल होऊन पाच दिवस झाली पण आरोपीला अजूनही अटक केलेली नाही.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading