साकेत ते कशेळी मार्गावरील वाहतुकीत ३० एप्रिल ते २ मे पर्यंत बदल

कापूरबावडी वाहतूक उप विभागाच्या हद्दीत साकेत ते कशेळी मार्गावर ३० एप्रिल ते २ मे पर्यंत साईबाबा मंदिराचा वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांमुळे या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये, परिसरातील वाहतूक सुरळीत आणि सुनिश्चित राहण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभाग पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार मे. राठोड यांनी दिली आहे.

वाहतुकीत बदल पुढील प्रमाणे :-

प्रवेश बंद – १) साकेत कडून बाळकुम मार्गे कशेळी कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना लोढा सोसायटी कडे जाणारे कट येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

        पर्यायी मार्ग – सदरची वाहने लोढा सोसायटी माजिवडा मार्गे इच्छित स्थळी जातील.

        प्रवेश बंद – २) कशेळी कडून बाळकुम मार्गे साकेत कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बाळकुम नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

            पर्यायी मार्ग – सदरची वाहने कापूरबावडी सर्कल मार्गे इच्छित स्थळी जातील.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading