ठाणे परिवहन सेवेच्या फक्त महिलांसाठी असलेल्या तेजस्विनी बसचा शुभारंभ – १० मार्गावर धावणार

ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेनं शहरातील महिलांना सुरक्षित प्रवास करता यावा म्हणून खास महिलांसाठी तेजस्विनी बसेस आजपासून सुरू केल्या आहेत. या १० तेजस्विनी बसेस १० विविध मार्गांवर धावू लागल्या आहेत. ठाण्यामध्ये सकाळी प्रवासाचा रोख हा रेल्वे स्थानकाकडे असतो तर संध्याकाळी रेल्वे स्थानकातून तो विविध भागात असतो. या मार्गावर या १० बसेस धावत आहेत. ठाणे स्टेशनकडे येण्याकरिता सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत आणि ठाणे स्टेशनकडून जाण्यासाठी ५ ते रात्री ९ पर्यंत केवळ महिलांसाठी या बसेस सोडल्या जाणार आहेत. महिला प्रवाशांची संख्या ज्या मार्गावर अधिक आहे अशा ठाणे पश्चिम ते वृंदावन सोसायटी, ठाणे पश्चिम ते लोकमान्य नगर, ठाणे पश्चिम ते वागळे आगार, ठाणे स्टेशन पश्चिम ते गावंड बाग, ठाणे स्टेशन ते पवारनगर, ठाणे स्टेशन ते खारेगाव, ठाणे स्टेशन ते कासारवडवली, ठाणे स्टेशन ते कोलशेत या मार्गावर फक्त महिलांसाठी तेजस्विनी बसेस धावणार आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading