ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा मार्ग मोकळा

ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांची सहाव्या वेतन आयोगातील विद्यमान वेतनश्रेणी आणि ग्रेड पे संरक्षित करुन त्याप्रमाणे सुधारित वेतन निश्चित करण्याबाबतचा शासन निर्णय आज प्रसिद्ध झाला. या निर्णयामुळे महापालिकेतील वर्ग 1 ते 4 च्या कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिकेच्या आस्थापनेवर असलेल्या काही पदांच्या वेतनश्रेणी या शासनाकडे असलेल्या वेतनश्रेणीशी समकक्ष आढळून न आल्याने या पदांबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागविण्यात आले होते. परंतु अनेक दिवसांपासून हा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. कोणत्याही संवर्गाचे वेतन कमी न करता कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीचा फेरविचार करण्याबाबतचा पत्रव्यवहार नरेश म्हस्के आणि नजीब मुल्ला यांनी केला होता. परंतु वर्ग 1 ते 4 मधील प्रलंबित कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीबाबत निर्णय होण्यास विलंब झाल्याने कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होत नव्हता. आज अखेर या मागणीला यश आले असून वर्ग 1 ते 4 च्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा शासननिर्णय आज प्रसिद्ध करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading