ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून वृत्तपत्र विक्रेत्याची सायकलच उचलून नेण्याचा प्रकार

ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं एका वृत्तपत्र विक्रेत्याची सायकलच उचलून नेण्याचा प्रकार केला आहे. वृत्तपत्र विक्रेते अनिल कोल्हे यांची सायकल टेकडी बंगला येथील पदपथावरील सायकल दुरूस्ती दुकानदाराकडे दुरूस्तीसाठी दिली होती. उथळसर विभागाचे अतिक्रमण अधिकारी सरमाळे यांना विक्रेत्यांना सायकल देण्याची विनंती करूनही त्याला सायकल परत देण्यात आली नाही. ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत इमारती, गाळे बिनदिक्कतपणे बांधले जात असताना त्यावर कारवाई होत नाही पण एका सामान्य वृत्तपत्र विक्रेत्याच्या सायकलवर कारवाई होते याचा निषेध म्हणून ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशन आंदोलन करणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading