ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या लिपिकास १० हजार रूपये स्वीकारताना अटक

ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या लिपिकास अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी १० हजार रूपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं आहे. ठाणे महापालिकेच्या मुंब्रा प्रभाग समितीमध्ये अतिक्रमण विभागात रतन बहिरव हे लिपिक आहेत. या प्रकरणातील तक्रारदारांनी अनधिकृत बांधकाम केलं होतं. या अनधिकृत बांधकामावर कारवाई करू नये यासाठी रतन बहिरव यांनी त्यांच्याकडे २५ हजार रूपये देण्याची मागणी केली होती. मात्र तडजोडीअंती २० हजार रूपये देण्याचं ठरलं. तक्रारदारांनी तक्रार केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मुंब्रा प्रभाग समितीच्या अतिक्रमण विभाग कार्यालयात पहिला हफ्ता म्हणून १० हजार रूपये स्वीकारताना रतन बहिरव यांना रंगेहात पकडण्यात आलं. न्यायालयानं त्यांना २ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading