ठाणे महापालिकेच्यावतीने आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवस साजरा

हवा प्रदूषणाच्या दुष्परिणामांबाबत नागरिकांमध्ये व्यापक प्रमाणात जागृती निर्माण होण्यासाठी महापालिकेच्या वतीने वाहनांमुळे होणा-या प्रदूषण नियंत्रणाकरिता मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करून आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोना काळात लॉकडाऊमुळे हवा मोठ्या प्रमाणात शुद्ध झाली आणि आकाश निरभ्र आणि निळेशार दिसू लागले. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघाने ७ सप्टेंबर २०२० हा दिवस ‘इंटरनॅशनल क्लीन एअर डे फॉर ब्लू स्काय’’ म्हणून घोषित केला असून प्रत्येक वर्षी ‘निळ्याशार आकाशासाठी स्वच्छ हवा दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. यावर्षीही महापालिकेच्या वतीने ७ सप्टेंबर २०२१ रोजी आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिनाचे औचित्य साधून वाहनांमुळे होणारे प्रदूषण नियंत्रणाकरिता मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन महापालिकेच्या वतीने करण्यात आले. यावेळी परिवहन सेवेतील बसेसचे अत्याधुनिक पद्धतीने होणाऱ्या साफसफाईचे आणि पीयूसी करतानाचे प्रात्याक्षिक विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. तसेच सीएनजी गॅसबाबत तसंच पीयूसी प्रमाणपत्राची माहिती देण्यात आली. यासोबतच सिनिअर केमिस्ट राजू जाधव यांनी हवा प्रदूषणाबाबत मार्गदर्शन केले. हवा प्रदूषणाशी निगडीत महत्वाचे घटक, वाहतूक प्रदूषण, औद्योगिक उत्सर्जन, डीजी सेट आणि वीट भट्ट्या, बायोमास, पीक, कचरा जाळल्याने होणारे उत्सर्जन तसेच बांधकाम आणि तोडफोड कचऱ्यामधून होणारे धूळ प्रदूषण, वाहनांची निगा आणि देखभाल,पीयूसी प्रमाणपत्राचे नूतनीकरण, लेन ड्रायविंग तसेच सार्वजनिक वाहतुकीवर लक्ष केंद्रित करणे आदी बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading