ठाणे महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मुरुडकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची धर्मराज्य पक्षाची मागणी

ठाणे महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मुरुडकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी धर्मराज्य पक्षाच्या नितीन देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. काही दिवसापूर्वीच मुरुडकर यांना लाच घेताना अटक झाली होती. अनेक दिवस पोलीस आणि न्यायालयीन कोठडीत असूनही त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली नाही उलट ते आरामशीर जीवन जगत आहेत. गंभीर गुन्हा करूनही त्यांना व्हीव्हीआयपी वागणूक मिळत आहे. कोविड काळात शासकीय अधिका-याने केलेलं हे कृत्य शोभनीय नसून त्यांच्यावर त्वरीत कारवाई करावी तसंच अशा नीचपणाला आश्वासित करणा-यांवरही तात्काळ कारवाई करण्याची मागणी नितीन देशपांडे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading