ठाणे महापालिकेची ३०० फेरीवाल्यांवर कारवाई – २८४ हातगाड्या जप्त

ठाणे महापालिकेनं फेरीवाल्यांच्या विरोधात सुरू केलेली कारवाई कायम ठेवली असून एका दिवसात ३०० फेरीवाल्यांवर कारवाई करत २८४ हातगाड्या जप्त करण्यात आल्या. ठाणे महापालिकेनं केलेल्या कारवाईत कोपरीमध्ये ३७ फेरीवाले आणि ३७ हातगाड्या, नौपाड्यामध्ये ३७ फेरीवाले ३७ हातगाड्या, वागळे प्रभाग समितीमध्ये २० फेरीवाले ७० हातगाड्या, लोकमान्यनगर-सावरकरनगर प्रभाग समितीमध्ये ३९ फेरीवाले २७ हातगाड्या, वर्तकनगर प्रभाग समितीअंतर्गत ५२ फेरीवाले आणि ५२ हातगाड्या, माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमध्ये २३ फेरीवाले १० हातगाड्या, उथळसर प्रभाग समितीमध्ये १५ फेरीवाले १२ हातगाड्या, कळव्यामध्ये ५८ फेरीवाले १७ हातगाड्या, मुंब्रा प्रभाग समितीमध्ये १५ फेरीवाले ६ हातगाड्या तर दिवा-शीळ प्रभाग समितीअंतर्गत ७ फेरीवाले आणि १६ हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली. ही मोहिम अशीच सुरू राहणार असल्याचं अतिक्रमण विभागानं म्हटलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading