ठाणे महापालिकेची नवी प्रभाग रचना जाहीर

ठाणे महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून आज महापालिकेची प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. ठाणे महापालिकेच्या नगरसेवकांची मुदत २५ फेब्रुवारी रोजी संपत आहे. आता त्यापूर्वी निवडणुका होणं शक्य नाही. त्यामुळं एकतर नगरसेवकांना मुदतवाढ मिळेल अथवा प्रशासक नेमावा लागेल. आज प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली असून त्यावर हरकती, सूचना मागवण्यात आल्या आहेत. हरकती सूचना १५ फेब्रुवारी पर्यंत दाखल करता येणार आहेत. त्यानंतर या हरकती सूचनांवर निर्णय होईल आणि मग प्रभाग रचना नक्की होईल. त्यानंतरच निवडणुका होतील. ठाणे महापालिकेच्या नगरसेवकांमध्ये आता वाढ होणार असून पूर्वी १३१ नगरसेवक होते आता त्यामध्ये ११ सदस्यांची भर पडणार असून निवडणुकीनंतर नगरसेवकांची संख्या १४२ होणार आहे. प्रभाग रचना जाहीर झाल्यापासून टिका टिप्पणी सुरू झाली आहे. भारतीय जनता पक्षानं ही प्रभाग रचना अनैसर्गिक पद्धतीने झाल्याचा आरोप केला आहे. ह्यात प्रभागाच्या विकासाचा आणि पर्यायाने नागरिकांना सुविधा देण्याचा कोणताच हेतू दिसत नाही उलट राजकीय आणि निवडणुकीची गणितं बसवण्यासाठी केलेली ही प्रभागरचना असल्याची टीका केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading