ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या बसला आज सकाळच्या सुमारास आग

ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या बसला आज सकाळच्या सुमारास आग लागण्याचा प्रकार घडला. परिवहन सेवेच्या आनंदनगर आगारच्या बसच्या स्टार्टरमध्ये शॉर्टसर्कीट होऊन किरकोळ आग लागली होती. ही बस आलिमघरकडून ठाणे रेल्वे स्टेशनला जात होती. घटनेची माहिती कळताच आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन मदतकार्य सुरू करून आगीवर नियंत्रण मिळवलं. या बसमध्ये १५ प्रवासी प्रवास करत होते. या प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading