ठाण्यातील योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे यांच दुख:द निधन

योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे यांचं अल्पशा आजारानं निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. गेले काही दिवस आजारी असल्यामुळं त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारांना प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांची प्राणज्योत आज सकाळी मावळली. योगाला आजचं रूप येण्यापूर्वीपासून व्यवहारे यांनी योगाचा प्रचार आणि प्रसाराचं काम केलं. बंदीजनांपासून मतिमंदांपर्यंत त्यांनी सर्वांना योगाचं प्रशिक्षण दिलं. योगाद्वारे अनेक आजारांवर त्यांनी उपचार केले. भारतामध्ये त्यांनी कैद्यांच्या जीवनात बदल व्हावे म्हणून सर्वात प्रथम बंदीजनांना योगाविषयी मार्गदर्शन केलं. स्मृती संवर्धनासाठी मेधा संस्कार, गर्भवती स्त्रियांसाठी योगांकुर, मधुमेहासाठी विशेष वर्ग असं त्यांनी विशेष योग वर्ग सुरू केले होते. योगतरंग मासिकही त्यांनी सुरू केलं होतं. त्यांच्या मागे २ मुलं, सूना, नातवंडं असा परिवार आहे. आज शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. उद्या सहयोग मंदिर येथे साडेदहा वाजता एका शोकसभेचं आयोजन करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading