समता विचार प्रसारक संस्थेतर्फे ठाण्यात एकलव्य विद्यार्थ्यांसाठी वारली चित्रकलेचे प्रशिक्षण शिबीर

समता विचार प्रसारक संस्थेतर्फे ठाण्यात एकलव्य विद्यार्थ्यांसाठी वारली चित्रकलेचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. वारली चित्रकलेत प्रविण असलेल्या कलाकार शहनाज शेख आणि येऊर येथील आदिवासी समाजातील एकलव्य विद्यार्थी करीना साऊद यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर घेण्यात आलं. एकलव्य पुरस्कार म्हणजे हातात आलेली धगधगती मशाल आहे. ही मशाल घेऊन तुम्हाला तुमच्या प्रतिकूल परिस्थितीशी लढत पुढे जायचे आहे. समता विचार प्रसारक संस्थेच्या एकलव्य पुरस्काराने आपल्या आत्मविश्वासात वाढ झाल्याचे प्रमुख पाहुणे माजी एकलव्य विद्यार्थी किशोर म्हात्रे यांनी आपल्या मनोगतात सांगितलं. यशस्वी झाल्यावर मात्र आपल्या लढतीत आपल्याला मदत करणार्‍यांची जाण ठेऊन आपणही गरिबीच्या प्रतिकूलतेत लढणार्‍या विद्यार्थ्यांना सढळ हस्ते मदत करून समाजाचे ऋण फेडले पाहिजे असंही ते म्हणाले. संस्थेतर्फे आयोजित करत असलेल्या समता संस्कार शिबीर, नाट्यजल्लोष, क्रिडास्पर्धा आणि चित्रकला, रांगोळी अशा सारख्या विविध कलांच्या शिबिरात सहभाग घेतल्याने मुलांच्या व्यक्तिमत्व विकासात हातभार लागतो. अभ्यासासह अशा प्रकारच्या कालगुणांना वाव देण्याचा संस्था नेहमीच प्रयत्न करते. शहनाज शेख यांनी आदिवासींच्या जंगलातील राहणीमानाची माहिती दिली. दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये आयोजित केलेल्या या शिबिरात ७० एकलव्यांनी सहभाग घेतला. मानपाडा, माजिवडा, कळवा, कोपरी, सावरकर नगर अशा वेगवेगळ्या विभागातून आलेल्या विद्यार्थ्यांना शहनाज शेख आणि करीना साऊद यांनी मार्गदर्शन केले.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading