ठाणे पोलीसांनी ९ कासवं आणि काही पोपट हस्तगत केले आहेत. ठाणे पोलीसांना मालाड पूर्वतील एका दुकानात असे प्राणी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वाईल्ड लाईफ आणि मानव वन्यजीव संरक्षक यांच्या सहकार्यानं या दुकानामध्ये छापा टाकण्यात आला. या छाप्यात ९ कासवं आणि काही पोपट आढळले. या दुकानाचा मालक प्रमोद सुरप्पा याच्याकडे हे पक्षी कुठून आणण्यात आले याची चौकशी करण्यात आली त्यावेळी त्याने हे पक्षी क्रॉफर्ड मार्केट येथून आणल्याचं सांगितलं. त्याच्या माहितीवरून पोलीसांनी क्रॉफर्ड मार्केटमध्ये असे पक्षी विकणा-या शकील खान, रशिद खान आणि दीपक म्हात्रे अशा तिघांना अटक केली आहे. अंधश्रध्देला बळी पडू नये असं आवाहन पोलीसांनी केलं आहे. कोणाच्या घरात अशा प्रकारे वन्य प्राणी आढळल्यास त्यांच्यावर वन्य जीव संरक्षण अधिनियमांतर्गत कारवाई केली जाईल असा इशाराही पोलीसांनी दिला आहे.