ठाणे पोलिसांनी आपली कार्यपध्दती न सुधारल्यास जनद्रोहाचा आनंद परांजपेंचा इशारा

ठाणे पोलिसांनी आपली कार्यपध्दती सुधारली नाही तर जनद्रोह होईल असा ईशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला आहे. आज एका पत्रकार परिषदेत त्यांनी हा इशारा दिला. पोलिस हे शासनाच्या इशाऱ्यावर नाचत असुन न्यायालयात आत्तापर्यत ते ३ वेळा उघडे पडले आहेत. महेश अहेर मारहाण प्रकरणात हाताने मारहाण झाल्याचे दिसत असतानाही पोलिसांनी वेगळीचं कलम लावली आहेत. आम्ही चूकीचं काम करत नाही. संविधानान दिलेल्या हक्कानुसार आम्ही आंदोलन करणार आणि घोषणही देणारचं असा ईशारा परांजपेंनी दिला. पोलिसांनी चूकीचं काम करण्यापेक्षा आम्हाला पोलिस मैदानावर बोलवाव आणि जनरल डायरप्रमाणे आमच्यावर गोळ्या घालाव्यात असही परांजपे यांनी सांगीतलं. ठाण्याचे पोलिस आयुक्त हे जनरल डायर असल्याचा आरोपही परांजपे यांनी यावेळी बोलताना केला. पोलिसांनी आपली कार्यपध्दती न सुधारल्यास राजकीय कार्यकर्तेच नाही तर जनताही द्रोह करेल असा ईशाराही आनंद परांजपे यांनी दिला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading