अनोख्या शैलीतील ठिपका चित्रांचे ( Stippling Painting ) प्रदर्शनाचे डॉ अरविंद जामखेडकर यांच्या हस्ते उदघाटन

राच्यविद्या अभ्यास संस्था, ठाणे येथे ज्येष्ठ चित्रकार श्री विलास बळेल यांच्या अनोख्या शैलीतील ठिपका चित्रांचे ( Stippling Painting ) प्रदर्शनाचे ऊदघाटन झाले. कर्नाटकातील सीमावर्ती भागातील अनेक सुंदर मूर्तीशिल्पांचे ठिपक्यांनी बनवलेली चित्रे या प्रदर्शनात पहावयास मिळणार आह्रे.
या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र सरकारच्या पुरातत्त्व विभागाचे माजी संचालक व जेष्ठ पुरातत्त्व शास्त्रज्ञ डॉ अरविंद जामखेडकर यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता झाले. या प्रसंगी प्राच्यविद्याआभ्यास संस्थेचे अध्यक्ष डॉ विजय बेडेकर, चित्रकार श्री विलास बळेल, श्री विजयराज बोधनकर, जेष्ठ शिल्पकार श्री सिद्धार्थ साठे, श्री सदाशिव कुळकर्णी आणि या प्रदर्शनाचे सयोजक डॉ महेश बेडेकर व्यासपीठावर उपस्थित होते .

आपल्या ‘भारतीय मंदिरांची शिल्पकला’ या विषयावरील ऊदघाटनपर भाषणात डॉ. जामखेडकर यानी भारतीय मंदिरातील स्थापत्य कला आणि त्यामागील तत्वज्ञांनाची कारणमिमांसा केली. भारतीय मंदिरे, पूजाविधी आणि प्रतिमा विज्ञान यावर श्री जामखेडकर यांनी चर्चा केली. डॉ विजय बेडेकर यांनी या प्रदर्शनाचे महत्व विशद करुन तरुणांनी या अभ्यासासाठी प्राच्यविद्या अभ्यास संस्थेच्या संदर्भ ग्रंथालयाचा उपयोग करण्याचे आवाहन केले.

या प्रदर्शनात कर्नाटकच्या सीमावर्ती भगातील मंदिरातील शिल्पांचे ठिपका चित्रे (stippling paintings) प्रदर्शित केलेआहेत. सदरचे प्रदर्शन ५ मार्च २०२३ ते १२ मार्च या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत उघडे राहील.

या प्रदर्शनाच्या निमित्ताने शनिवार दिनांक ११ मार्च २०२३ रोजी सकाळी ११ वाजता श्री विलास बळेल यांच्या चित्रकलेच्या प्रत्यक्ष सादरीकरणाचा अनुभव रसिकांना घेता येईल. याप्रसंगी प्रसिद्ध चित्रकार श्री. सदाशिव कुलकर्णी चित्रकलेविषयी अधिक माहिती देतील.
रविवार दिनांक १२मार्च २०२३ रोजी सकाळी ११ वाजता ज्येष्ठ शिल्पकार सिद्धार्थ साठे व ज्येष्ठ चित्रकार विजयराज बोधनकर यांच्या कलांचे प्रत्यक्ष सादरीकरण पाहण्याचा दुर्मिळ योग कलारसिकांना अनुभवता येणार आहे. या कार्यक्रमाच्या दरम्यान जेष्ठ व्हायोलीन वादक श्री. मोहन पेंडसे व्हायोलीन वादन करणार आहे. हा कार्यक्रम म्हणजे शिल्पकला, चित्रकला आणि कलेविषयी व्याख्यानांचा त्रिवेणी संगम असणार आहे. हा संपर्ण कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. या प्रदर्शनास आणि त्यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाना आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन प्राच्यविद्या अभ्यास संस्थेचे अध्यक्ष डॉ विजय बेडेकर यांनी केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading