होळी धुळवड दरम्यान ठाणे पोलिस आयुक्तालयात कडेकोट पोलिस बंदोबस्त

होळी धुळवड दरम्यान ठाणे पोलिस आयुक्तालयात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असुन सी सी टीव्ही व्दारेही लक्ष ठेवले जाणार आहे. ७ ते १२ मार्च हा उत्सव साजरा होणार आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयातील ५ परीमंडळात ५६१ सार्वजनीक तर २१२१ खासगी होळ्या प्रज्वलीत केल्या जाणार आहेत. यासाठी ३ अप्पर पोलिस आयुक्त, ७ पोलिस उप आयुक्त, ११ साहाय्यक पोलिस आयुक्त, ४०० पोलिस आधिकारी,
३ हजार अंमलदार महत्त्वाच्या विविध चौकांमध्ये ४२ पोलिस आधिकारी, ५०० पोलिस अंमलदार, नागरी गणवेशातील ७० आधिकारी आणि आमंलदार असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अंगावर रंग आणि पाणी फेकणे, महिलांची छेडछाड, ध्वनी क्षेपकाचा अवाजवी आवाज, बीभत्स नृत्य, रंग, गुलाल यावर विशेष लक्ष राहणार आहे. मद्यपान करून हुल्लडबाजी करणाऱ्यांवर भरारी पथकाद्वारे नजर ठेवली जाणार आहे. या उत्सवादरम्यान संशयीत हालाचाली संशयीत वस्तू आढळल्यास त्याची त्वरीत माहीती द्यावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading