ठाणे पालिकेच्या अधिकार्‍यांना लक्ष्य करण्यासाठी तथाकथीत दक्ष नागरिकांकडून बनावट तक्रारी

ठाणे महानगर पालिका प्रशासनाला आता एका विचित्र समस्येला सामोरे जावे लागत आहे. ठाणे पालिकेच्या अधिकार्‍यांना लक्ष्य करण्यासाठी तथाकथीत दक्ष नागरिकांकडून बनावट तक्रारी करण्यात येत आहेत. तक्रारअर्जावर नाव एकाचे तर संपर्क क्रमांक दुसर्‍याचा टाकून तक्रारी करण्यात येत आहेत. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ठाणे महानगर पालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना लक्ष्य करण्यासाठी अज्ञात इसमाने बनावट नावाने तक्रार केलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून ठामपा हद्दीमध्ये अनधिकृत बांधकामांवरील कारवाईचा वेग वाढला आहे. त्यामुळे काही समाजकंटक हवालदील झाले आहेत. त्यातूनच या तक्रारी करण्यात येत आहेत. मात्र, या तक्रारी करण्यासाठी बनावट नाव आणि भलत्याचाच संपर्क क्रमांक नमूद करण्यात येत आहे. अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात ही बनावट तक्रार करण्यात आलेली आहे. बाळकूम येथील पत्ता असलेल्या तक्रारअर्जावर गणेश पाटील असे नाव असून त्याखाली प्रफुल वाघोले यांचा संपर्क क्रमांक टाकला आहे. याबाबत वाघोले यांना विचारणा झाल्यानंतर हे बनावट तक्रारीचे प्रकार उघडकीस आले. त्यामुळे वाघोले यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading