पेट्रोल डिझेलचे दर कमी करताना पण 48 तास आगाऊ सूचना द्यावी – पेट्रोल पंप चालकाची अपेक्षा

पेट्रोल डिझेलचे दर कमी करताना पण 48 तास आगाऊ सूचना द्यावी अशी अपेक्षा ठाण्यातील एक पेट्रोल पंप चालक राजू मुंदडा यांनी व्यक्त केली आहे. शासनाने काल मध्यरात्रीपासून पेट्रोलच्या दरात लिटरमागे पाच रुपये तर डिझेलच्या दरात लिटरमागे तीन रुपये कपात केली आहे. ही कपात करताना शासन नेहमी अचानक कपात अथवा वाढ करतो मात्र यामुळे पेट्रोल पंप चालकांना नुकसान होतं. पेट्रोल डिझेलच्या दारात कपात करण चांगलं असलं तरी यामुळे पेट्रोल पंप चालकांना मोठं नुकसान होतं, त्यामुळे शासनाने दर कपातीची सूचना 48 तास आगाऊ दिल्यास या मुळे होणारे नुकसान कमी करता येऊ शकेल असं मुंदडा यांचं म्हणणं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading