ठाणे जिल्ह्याचा शालांत परीक्षेचा निकाल ९६.६१ टक्के

शालांत परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून आज जाहीर झालेल्या शालांत परीक्षेच्या निकालात ठाणे जिल्ह्याचा निकाल ९६.६१ टक्के लागला आहे. ठाणे जिल्ह्यातून १ लाख ७ हजार ५४६ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी १ लाख ३ हजार ९०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ३७ हजार ४६९ विद्यार्थ्यांना विशेष योग्यता, ३७ हजार ८७५ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी, २२ हजार ३६८ विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी तर ६ हजार १८८ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading