संगीत संध्या यूट्यूब कार्यक्रमातून गरजूंना रोजगार मिळणार

लॉकडॉऊनमुळे कलावंतांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. या सर्व कलावंतांना मदतीचा हात देण्यासाठी ठाण्यातील संगीत वादक शशांक कल्याणकर यांनी संगीत रजनी या लाईव्ह कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. ठाण्यातील एक संगीत संध्याचे आयोजक शशांक कल्याण यांनी यूट्यूब चॅनेल च्या माध्यमातून तुम मुझे यू.. भूला न पाओगे.. या कार्यक्रमाचं आयोजन केलं असून यातून मिळणारे सर्व मानधन, प्रायोजक रक्कम या कार्यक्रमात काम करणाऱ्या कलावंतांना रोजगार म्हणून देणार असल्याचे शशांक कल्याणकर यांनी सांगितले. सध्या अनेकजण बेरोजगार झाले आहेत. यामध्ये सिनेमा, नाटक, संगीत क्षेत्रात काम करणारे कलाकार, बॅकस्टेज आर्टिस्ट, रंगमंच, नृत्य कलाकार, स्पॉटबॉय, वादक असे अनेक कलावंत बेरोजगार झाले आहेत. या कार्यक्रमामुळे गरजू कलावंतांना रोजगार मिळू शकणार आहे. इच्छुकांनी या उपक्रमाला हातभार लावावा असं आवाहनही कल्याणकर यांनी केलं आहे.
तसेच संगीत प्रेमींनी युट्यूबवर https://youtu.be/8W0hvyiUHG0 या लिंकवर क्लिक करून हा लाईव्ह कार्यक्रम पहावा तसेच इच्छुक देणगीदारांनी या उपक्रमाला हातभार लावावा असे आवाहनही कल्याणकर यांनी केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading