ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीचा दारूण पराभव

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला असून बहुजन विकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षानं या निवडणुकीत बाजी मारली आहे. बँकेच्या संचालक मंडळाच्या ३१ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी ६ संचालक बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळं १५ जागांसाठी मतदान झालं. या मतदानात महाविकास परिवर्तन आघाडीचा दारूण पराभव झाला आणि बहुजन विकास आघाडी, भारतीय जनता पक्ष युतीनं २१ पैकी १८ जागांवर वर्चस्व मिळवलं. निवडणूक जाहीर झाल्यापासून राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं ही निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली होती. सर्व शक्ती पणाला लावूनही महाविकास परिवर्तन आघाडीला पराभवाला सामोरं जावं लागलं. राज्यात सत्तेवर असतानाही जिल्हा बँकेवरील वर्चस्व आघाडीच्या हातातून निसटलं. या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनी आपलं वर्चस्व कायम राखण्यात यश मिळवलं. बँकेवर प्रशांत पाटील, अरूण पाटील, सुभाष पवार, मधुकर पाटील, इंद्रजीत पडवळ, लक्ष्मण डोंबरे, जगन्नाथ चौधरी, निलेश भोईर, भाऊ हडे, शिवाजीराव शिंदे, नीता कांबळी, रेखा पष्टे, राजेश पाटील, अनिल मुंबईकर, निवृत्ती घुसेकर असे १५ जण संचालक म्हणून निवडून आले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading