जिल्ह्यात आज कोरोनाचे ३ हजार १७१ नवे रूग्ण

ठाणे जिल्ह्यात आज कोरोनाचे ३ हजार १७१ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात १९ जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत २ लाख ८१ हजार ६४१ रूग्ण कोरोनातून बरे झाले तर ६ हजार ४६९ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ३० हजार ९०१ रूग्ण उपचार घेत असून आत्तापर्यंत एकूण ३ लाख १९ हजार ११ पॉझिटिव्ह रूग्ण आत्तापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात आज ९९५ नवे रूग्ण सापडले ५ मृत्यू तर सध्या ९ हजार ७४ रूग्ण उपचार घेत आहेत. ६७ हजार ४३२ कोरोना रूग्ण बरे झाले तर १ हजार ४४८ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये आज ८५५ नवे रूग्ण, ३ मृत्यू तर ८ हजार ६३२ रूग्ण उपचार घेत आहेत. ६९ हजार २८५ बरे झाले तर १ हजार २५६ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज ५५४ नवे रूग्ण ३ मृत्यू तर ६ हजार १३६ रूग्ण उपचार घेत आहेत. ५८ हजार १९८ रूग्ण बरे झाले तर १ हजार १७५ दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये आज २३३ नवे रूग्ण, २ मृत्यू तर २ हजार १९८ रूग्ण उपचार घेत आहेत. २७ हजार ६११ कोरोनातून बरे झाले तर ८२५ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज १७८ नवे रूग्ण, ० मृत्यू तर १ हजार ४११ रूग्ण उपचार घेत आहेत. १२ हजार ६७ बरे झाले तर ३७८ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज ७४ नवे रूग्ण, ४ मृत्यू तर ५३५ रूग्ण उपचार घेत आहेत. ६ हजार ७९१ कोरोनातून बरे झाले तर ३६० जणं दगावले. अंबरनाथमध्ये १०९ नवे रूग्ण, ० मृत्यू तर १ हजार ५३९ रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत आहेत. ८ हजार ९९८ बरे झाले तर ३१९ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज १२४ नवे रूग्ण, ० मृत्यू तर ६३८ रूग्ण उपचार घेत आहेत. ११ हजार ६२९ कोरोनामुक्त झाले तर १२४ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये आज ४९ नवे रूग्ण, १ मृत्यू तर ७३८ रूग्ण उपचार घेत आहेत. १९ हजार ६६७ बरे झाले तर ६०८ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading