ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठान आणि नगरसेविका प्रतिभा मढवी यांच्यातर्फे प्रभागातील सफाई, कंत्राटी आणि घंटागाडी कर्मचा-यांना धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. डॉक्टर ,पोलिस यांच्याबरोबरच महापालिकेचे सफाई कामगार, कंत्राटी कामगार, घंटागाडी कामगार हेही जीवावर उदार होऊन काम करीत आहेत. परंतु लॉकडाऊनमुळे त्यांच्या कुटुंबियांची फार ओढाताण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठान आणि नगरसेविका प्रतिभा मढवी यांच्या वतीने गरीब गरजू कर्मचाऱ्यांना धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप पंपिंग स्टेशन येथील पेटीवर करण्यात आले.